
जन्माला आल्यापासून या जगाने मला आपल्या मोह मायेच्या जाळ्यात ओढलं. एखादं यश निसटल की नैराश्य येऊ लागलं. दुसऱ्याच्या यश-अपयशाने फरक नाही पडला कधी पण स्वतःचं यश वाळू सारखा निसटताना पाहून दु:ख नेहमीच झालं. स्वतःमुळे कधी तर कधी परिस्थितीमुळे. पण इतरांना किंवा परिस्थितीला दोष देणाऱ्याला म्हणे जग दोष देतं. म्हणून नेहमीच स्वतःचं दु:ख छोटं आहे असच मानून चालत राहिले..
हसण्याची आणि हसवण्याची सवयच झाली. कितीही वाईट वेळ आली तरी जग आपल्या पेक्षा किती तरी दु:खी आहे एवढ्यासाठी नेहमी गप्प बसले. माझे घरचे आणि अनिश या बाहेरही मैत्री आणि जग असतं हे कळण्यासाठी एका आंदोलनाची गरज पडली. मी आज जशी आहे तशी मी कधीच नव्हते एवढं मात्र खरं. नेहमी वरचेवर मैत्री, गप्पा, गोंधळ आणि शेवटी एकांतात घुसमट या पलीकडे जगच नव्हता ना माझं.. आणि वरून परीक्षेच्या यशामागे पाळणं तर चालूच होतं.. असे कितीतरी लोक होते जे माझ्या एका अपयशाने दुरावले. पण एकंच समजलं. ज्या माणसाला स्वार्थ साधता येत नाही तो कुठेही जगूच शकत नाही.
त्या एका अपयशाने सुरवात झाली ती मी कोण आहे आणि मला काय करायचय या शोधाकडे. हा शोध कधीही पूर्णच झाला नसता जर मी गोमंतकवर आलेल्या एका लेखावर चिडून स्वतः पेन आणि पेपर हातात घेऊन स्वतःचे विचार मांडले नसते तर. कारण त्याचमुळे मला एक गोष्ट समजली की मी माझ्या बाहेरच्या जगामुळेच फार प्रभावित होते. त्यामुळे स्वतःच्या जर मनाला शांती मिळवायची असेल तर माझ्या आजूबाजूलाच मला बदलावं लागेल एवढं समजलं. अजूनही आठवतो तो एप्रिल महिना मला. नेहमी विपिन शिरसाट काकांचा दुकानावर जायचे रंग आणायला. रंगकाम चालू होतं घराचं. एक दिवस सहज मी माझा लेख त्यांना दाखवला. काय वाटलं कुणास ठाऊक विपिन काकांना पण त्यांनी भाषा माध्यम प्रश्न माझ्या समोर मांडला.. चर्चा सुरु. रात्री सगळी दुकानं बंद झाली होती. पण या विषयावर सखोल मंथन चालूच होतं. पोटात उंदीर जशी भूक लागली आहे याची जाणीव करून देत होते तसेच हे विचार या विषयावर भूक वाढवत नेत होते.. शेवटी एक ढाचा तयार झाला. एक लेख लिहिण्याचं ठरलं देखील.
संपूर्ण लेख तयार झाला आणि त्या विषयी पुन्हा काकांकडून विचार जाणून घेतले. १५ एप्रिल २०११ या दिवशी तो लेख ऊर्जा, गोमंतक मध्ये छापला गेला. खूप प्रमाणात लोकांना हे विचार पटले. प्रशंसाही मिळाली आणि मला स्वतःचे विचार खंबीरपणे मांडण्याची सवयच झाली. त्यानंतर माझा भाषा माध्यम, आणि भ्रष्टाचार विरुद्ध भारत सारख्या आंदोलनातून वावर जग जाहीर आहे. पण त्या मागे माझी लेखणी आणि ते विचार फार महत्वाचे ठरले. आज भाषा माध्यमावर लागलेल्या निकालात मला यश दिसत नाही पण समाधान नक्कीच दिसतंय. एक ना एक दिवस सगळ्यांनी केलेल्या परिश्रमांच फळ नक्की मिळेल. लोकांवर, सत्ताधारकांवर नव्हे तर मला देवावर आणि एवढ्या सगळ्या वावरलेल्या लोकांच्या विश्वासावर विश्वास आहे. आणि ते समाधान राखण्यासाठी आता खारीचा वाट उचलण्यासाठीही मी सज्ज आहे.
या आंदोलनात मी भाग घेतला नसता तरी २ हात आणि २ पाय अजून कुणाचे तरी लाभलेच असते या आंदोलनाला. पण या आंदोलनामुळे मला जेवढा एक व्यक्ती म्हणून फायदा झाला त्या बद्दल मी या आंदोलनाची आभारी आहे. मान-अपमान, यश-अपयश या पलीकडेही 'समाधान' आणि स्वतःला जे पटतं तेच करण्याची ताकद मला लाभली. आजही विचार केला की जर हे आंदोलन झालंच नसतं तर? दिगंबर कामतने माझा वैयक्तिक फायदा केलेला माझ्या नेहमीच लक्षात राहील. :P पण आज मी जे जसे आहे त्याला हे आंदोलनच कारण आहे हे मात्र खरं.
जवळ जवळ एक वर्ष उलटून गेल्यानंतर त्या स्मृतींवर आज एक प्रकाश घालण्याचा मनात विचार आला आणि माझ्या एवढ्या 'समाधानी' वृत्तीचं कारण उलगडण्याचाही विचार आला म्हणून हे विचार वाहू दिलेत. :)
nice..!! :)
ReplyDeleteThank ya buD! :)
ReplyDelete